वसई : वसईतील चांदनी साह या ८ वर्षीय मुलीच्या हत्येचा छडा अखेर लागला आहे. तिच्याच शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून अटक केली तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकऱणी वडिलांना पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या वाण्याचा पाडा येथे राहणारी चांदनी साह ही ८ वर्षीय मुलगी १ डिसेंबर पासून बेपत्ता होती. सोमवारी तिचा मृतदेह घराशेजारील एका मोकळ्या घरात गोणीत आढळून आला होता. चांदनीची हत्या तिच्याच शेजारी राहणार्‍या १४ वर्षीय मुलाने केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्याचे वडील रामेश्वर कराळे यांना पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाला गुन्हे शाखा २ च्या पथकाने जालना येथून अटक केली आहे. तर आईची देखील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : वसई : कारचा टायर फुटल्याने महामार्गावर भीषण अपघात, सकवार येथील घटना; दोन जण ठार तर पाच जण जखमी

हत्या करून मृतदेह दोन दिवस घऱात दडवला

शुक्रवार १ डिसेंबर रोजी चांदनी शाळेतून आल्यानंतर घराबाहेर खेळत होती. त्यावेळी १४ वर्षीय विधीसंघर्ष बालकाने तिला आपल्या घरात नेऊन गळा दाबून तिची हत्या केली. दोन दिवस चांदनीचा मृतदेह घरातच एका गोणीत दडवून ठेवला होता. त्यानंतर मुलाचे वडील रामेश्वर कराळे यांनी ती गोणी याच चाळीतील एका मोकळ्या खोलीत आणून टाकली. पोलीस तपास करत असताना आरोपीच्या घराबाहेर चांदनीची चप्पल सापडली होती. त्यावरून पेल्हार पोलिसांनी मुलाचे वडील रामेश्वर कराळे याला अटक केली. आरोपीला बुधवारी वसईच्या न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली.

हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते गिळंकृत, राडारोड्याच्या ढिगाऱ्यामुळे ये-जा करण्याचे मार्ग बंद

मुलाला आरोपीने जालना येथे गावी पाठवून दिले होते. परंतु युनिट ३ च्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जालना येथून त्याला अटक केली. मुलगा जालना येथे मावशीच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही जालन्यात पोहोचून सापळा लावला आणि मुलाला अटक केली अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूजी रणावरे यांनी दिली. चांदनीची हत्या नेमकी का केली ते कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगी विधिसंघर्ष बालकाला चिडवत होती त्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची एक शक्यता आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai 14 year old boy killed 8 year old girl chandani saha murder case css