वसई: सोमवारी पडणार्‍या पावसाने वसईत आणखी एक बळी घेतला आहे. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे नाल्यात बुडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन महाडिक असे या तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथे राहणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वसई: तानसा नदीची पातळी वाढल्याने शेतीकामासाठी गेलेले नागरिक अडकले, एनडीआरएफच्या पथकाकडून १६ जणांची सुखरूप सुटका

रविवार रात्री पासून वसईत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथीे असलेल्या नाल्यात सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आर्यन महाडिक (१८) या तरुण बुडून मरण पावला. नालासोपारा येथे राहणारा आर्यन आपल्या मित्रासह या परिसरात आला होता. मात्र नाल्याजवळ संरक्षक भींत नसल्याने तो तोल जाऊन पडला असल्याची शक्यात आहे, अशी माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आहे. आर्यनचा मृतदेह शवविच्छदाासाठी पाठवला आहे. या नाल्याची भींत उंच करण्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगणार आहोत असे भोईर यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai 18 year old boy dies after drowning in a canal heavy rainfall css