वसई : मिरारोड ते वैतरणा या स्थानकाच्या दरम्यान सातत्याने रेल्वे अपघात होण्याच्या घटना घडत आहे. मागील वर्षभरात या रेल्वे मार्गात २२४ जणांचा अपघातात बळी गेला आहे. तर १५७ जण जखमी झाले आहेत. मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात सात स्थानकांच्या समावेश आहे. मागील काही वर्षांपासून या सर्व स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

विशेषतः विरार, नालासोपारा, वसई, नायगाव या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे काही प्रवासी लोकल मधून लटकून प्रवास करतात. त्यामुळे तोल जाऊन पडण्याचे प्रमाणही अधिक आहे. तर काही प्रवासी लवकर गाडी पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात. अशा वेळी लोकलच्या व भरधाव येणाऱ्या एक्सप्रेसच्या धडका लागून अपघात घडत आहेत. २०२३ मध्ये रेल्वे अपघातात २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ५० नैसर्गिक मृत्यू, १२३ प्रवाशांचा ठोकर लागून मृत्यू झाला आहे. ४५ प्रवासी गाडीतून पडून मृत्युमुखी झाले आहेत. ५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर १५७ प्रवासी रेल्वे अपघातात जखमी झाले आहेत, अशी माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू

हेही वाचा : वाहनांचे क्रमांक अचूक टिपणार्‍या कॅमेर्‍याचा फायदा; एका वर्षात वसई, ठाणे, मुंबईतील ९० गुन्हे उघडकीस

“रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. यंदा २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनीसुद्धा धोकादायक प्रवास करू नये” – सचिन इंगवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे</p>

१) अपघात व गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न

मागील दोन वर्षांपासून वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे विविध प्रकारचे गुन्हेही घडत आहेत. अपघात व गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासह इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : वसईतून बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींची तुंगारेश्वर जंगलातून सुटका, तबेल्यात काम करणार्‍या कामगाराला अटक

२) प्रवाशांच्या दुर्लक्षित पणाचा फटका

रेल्वेतील होणारे अपघात रोखण्यासाठी प्रवाशांसाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षण जाळ्या, भुयारी मार्ग अशी व्यवस्था केली आहे. परंतु काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. तर काही प्रवासी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देखील अनेकदा अपघातासारख्या घटना घडतात.

अपघात आकडेवारी

वर्ष मृत्यूजखमी
२०२२२३८१४५
२०२३२२४१५७