वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या (व्हाईट टॉपिंग) कामाने वसईतील एका दुचाकीस्वार तरुणाचा बळी गेला. महामार्गावरील ससूननवघर येथे अर्धवट कामामुळे या तरुणाची दुचाकी घसरली आणि तो कंटनेरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

एल्टन फर्नांडीस (३०) हा तरुण नायगावच्या अमोल नगर येथील निलांबरी सोसायटीत रहात होता. तो अंधेरी येथील एका कंपनीत काम करत होता. गुरूवारी पहाटे तो रात्रपाळी वरून आपल्या दुचाकीने घरी येत होता. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससूननवघर गावाच्या हद्दीतून तो जात होता. महामार्गावर सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे (व्हाईट टॉपिंग) काम सुरू असल्याने रस्ता वर खाली झाला आहे. त्यामुळे एल्टनची दुचाकी त्या फटीत अडकली आणि एल्टन घसरून पडला. नेमका त्यावेळी शेजारून जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या कंटनेर खाली तो आला. कंटेनरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू

हेही वाचा : आयुक्तालयातील १९ व्या पोलीस ठाण्याची निर्मिती; बोळींज पोलीस ठाण्याचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला. महामार्गावरील कामामुळे रस्ते असमांतर झाले असून सर्वत्र खडी पसरली आहे. त्यामुळे हा अपघात झाला आणि एल्टनचा मृत्यू झाला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहतकू अधिनियमाच्याकलम १८४, १८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : भाईंदर : नया नगर पोलीस ठाण्याबाहेर रक्तरंजित थरार; भररस्त्यात महिलेची पतीकडून हत्या

डिेसेंबरला होते लग्न…

एल्टनच्या मृत्यूने नायगावच्या अमोल नगर परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभावाच्या एल्टनचे ५ डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. तो त्याच्या तयारीत होता. आनंदाचे वातावरण असताना ही दु:खद घटना घडली असे त्याच्या मित्रांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी नायगावच्या पाली चर्चमध्ये त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader