वसई: वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत व शहरात रेडिमिक्स सिमेंट कारखाने उभारले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम हा नागरी आरोग्यावर होऊ लागला आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याशिवाय विकासाची कामे ही या भागात वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीच्या रेडिमिक्सच्या मालाची मागणी ही वाढली आहे. याच अनुषंगाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. मात्र हे प्रकल्प मालक पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळत नाहीत.

याशिवाय प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कारखान्यातून सतत धुळीचे प्रदूषण सुरूच आहे. ही सर्व धूळ थेट महामार्गावर येत असल्याने महामार्ग सुद्धा अक्षरशः सिमेंट काँक्रिटच्या धुळीने भरलेला असतो.या धुळीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वाढत्या धूळ प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावर ही याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त

हेही वाचा : वसई : मृत्यूच्या दाढेतून चिमुकली दिपिका सुखरूप आली घरी

तर दुसरीकडे या महामार्गालगतचा हिरवागार परिसर आहे.मात्र या प्रकल्पातून सतत उडणाऱ्या धुळीने येथील निसर्गरम्य परिसराची धूळधाण होऊ लागली आहे.अनेक झाडांवर हे धूलिकण बसून हिरवी झाडे ही धुळीने भरली आहेत. तर भात शेतीचे क्षेत्र, विविध प्रकारची फळझाडे ही धुळीच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडू लागली आहेत असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार उपायोजना करा

रेडिमिक्स सिमेंट कारखाने व त्यांच्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले आहे. यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना प्रकल्प धारकांना केल्या आहेत. यात २० हजार चौरस मीटर बांधकाम प्रकल्प भागात कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी २ हजार चौरस मीटर राखीव जागा, ३ महिन्यांच्या आत बॉक्स सारखे आच्छादन लावणे, नवीन प्रकल्प धारक मुख्य रस्त्याच्या ५०० मीटरपासून लांब असणे आवश्यक तर शाळा, नागरि वस्ती, रुग्णालये ५०० मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्र व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत प्रकल्प उभे करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक, तसेच जे आधीपासूनच प्रकल्प आहेत त्यांना २५ लाखांची बँक हमी सादर करावी लागणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी फवारणी, वाहतुकी दरम्यान विशेष काळजी घेणे यासह विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास मग प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

हेही वाचा : ‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर; विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची व्यूहरचना

प्रदूषण पसरविणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई सुरूच होती. आता नवीन मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्याचा आढावा ही घेतला जाईल. दिलेल्या वेळेत जर उपाययोजना केल्या नाहीत पुढील कारवाई केली जाईल.

आनंद काठोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघर

विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरएमसी वाहनांमुळे अपघाताचा धोका

महामार्गालगत सिमेंट कारखाने असल्याने आरएमसी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करू लागली आहे. दररोज महामार्गावर आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना धडक लागून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. एकापाठोपाठ एक अशी वाहने असतात धूळ प्रदूषण इतके असते ही वाहने दिसून येत नाहीत अशा वेळी अपघात होऊ शकते असे वाहनचालकांनी सांगितले आहे. अशी धोकादायक वाहतूक करणाऱ्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Story img Loader