वसई: भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या गेली. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. हरिष मेहता (६०) आणि जय मेहता (३०) अशी त्यांची त्यांची नावे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास वसई रेल्वे पोलीस करत आहेत. मेहता कुटुंबिय वसईच्या वसंत नगरी येथे राहतात. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हरिष मेहता (६०) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (३०) यांचा मृतदेह भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वसईत नाल्यात बुडून तरूणाचा मृत्यू

वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता पिता-पुत्र सोमवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. फलाटावरून क्रमांक ६ वरून उतरून ते मीरा रोडच्या दिशेने रेल्वे रुळांवरून चालत गेले. काही अंतरावरच लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही मध्ये ते उतरून चालत जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी दिली. त्यांनी आत्महत्या का केली त्याचा आम्ही तपास करत आहोत, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai at bhaindar railway station father and son commits suicide on railway track css