वसई: वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्ट मध्ये असलेल्या तरणतलावात बुडून दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. रिद्धी माने असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्याने या रिसॉर्ट मध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. बुधवारी सकळी विरारच्या कारगिल नगर येथे राहणारी एक महिला आपल्या मुलीसह रानगावच्या रॉयल रिसॉर्ट मध्ये आली होती. रिद्धी ही तरणतलावात आईसह उतरली होती. काही वेळाने तिथे आई रिसॉर्टच्या खोलीमध्ये गेली होती. तेव्हा रिद्धी च्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, मिरा रोडचा ढोंगी बाबा विनोद पंडितला अटक

या प्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे. तपास चालू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली. या रिसॉर्ट मध्ये जीवरक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. वसई विरारच्या रिसॉर्ट मधील जलतरण तलावात यापूर्वी देखील अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठलेही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.