वसई: समाजमाध्यमावर बदनामी केली म्हणून भाजप कार्यकर्ते प्रतीक चौधरी यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात गाठून मारहाण केली. या प्रकरणी वसई पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्या तशा राजकीय वातावरण पेटू लागले आहे. वसईतील बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाजमाध्य्मांवर शाब्दीक चकमकी होत असतात. भाजपाचे कार्यकर्ते प्रतीक चौधरी हे दुचाकीवरून जात असताना सागरशेत पेट्रोलपंपाजवळ बविआचे कार्यकर्ते स्वप्नील नर आणि अन्य दोन कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडवली. आमच्या पक्ष आणि नेत्यांविरोधात वक्तव्य करत असल्याबाबत जाब विचारला आणि मारहाण केली. या मारहाणीत प्रतीक चौधरी किरकोळ जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भाईंदर: वादात सापडलेल्या ‘महावीर भवनाचा’ कार्यक्रम जैन आचार्यांच्या उपस्थितीत संपन्न

या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी स्वप्नील नर आणि अन्य जणांविरोधात भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम १८९)२), १९०, १९१ (२), १९१ (१),११५(२) ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी पोलिसांनी स्वपनील नर आणि सरोज खान यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालातून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. राजकीय वैमन्यसातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली .