वसई : पतंग महोत्सवात नायलॉन मांज्याचा वापर केल्याप्रकरणी स्मार्ट सिटी च्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या परिसरातून जाणार्‍या दुचाकीस्वाराचा गळ्यात नायलॉन मांजा अडकून ते जखमी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकर संक्रातीचा सण जवळ आला असून यानिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. पतंगबाजीला आतापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहे. परंतु पतंगबाजीसाठी नायलॉनच्या मांज्याचा वापर केला जात असल्याने तो धोकादायक ठरू लागला आहे. वसई पूर्वेच्या गोखिवरे परिसरात राहणारे विक्रम डांगे (३६) रविवारी संध्याकाळी ते पत्नी आणि मुलासह दुचाकीने मधुबन परिसरातून जात होते. मधुबन परिसरात पंतग उडविण्यात येत होत्या. यावेळी एका पतंगांचा माजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि ते खाली पडले. या मांज्यामुळे त्यांचा गळा चिरला गेला. त्यांना त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्याला ९ टाके घालण्यात आले असून प्रकृतिचा धोका टळला आहे.

हे ही वाचा… दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी

हे ही वाचा… वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा

याप्रकऱणी जखमी डांगे यांच्या पत्नी नितल डांगे वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी स्मार्ट सिटी च्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, १५५ (बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai biker injured due to nylon manjha kite festival organizers booked asj