वसई : रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या अंगावर अचानाक झाडाची मोठी फांदी पडली. या घटनेत त्याची दुचाकी घसरली आणि तो थोडक्यात बचावला. विरार पश्चिमेच्या चाळपेठ उंबरगोठण येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. त्याचा सीसीटीव्ही सध्या वायरल झाला आहे.

विरार पश्चिमेला उंबरगोठण गावात चाळपेठ परिसर आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारा या रस्त्यावरून झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून जात होता.

महाराष्ट्र बॅंकेसमोरून जात असताना अचानक एका मोठ्या झाडाची फांदी कोसळली. त्यात दुचाकी स्वार अवघ्या एका सेंकदासाठी बचावला. मात्र त्याची दुचाकी घसरली. तो किरकोळ जखमी झाला.

त्याला उपचारासाठी स्थानिकांनी रु्गणालयात दाखल केले. झाडाची फांदी जवळील महावितरणाच्या वायरीवर पडल्याने आगीचा स्पार्क देखील उडाला होता. पंरतु मोठी दुर्घटना टळली.