वसई: खोट्या जाहिराती देऊन फसवणूक करणार्‍या चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत ३५हून अधिक जणांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असतात, त्यामुळे चाळ माफिया सक्रीय झाले आहे. यातील दिपक सिंग हा रेल्वे स्थानक परिसरात फसव्या जाहिराती देऊन लोकांचा दिशाभूल करत होता. आपली जागा असल्याचे भासवून चाळ बांधून देण्याचे आमीष लोकांना देत होता. मात्र त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची आर्थिक फसवणकू करत होता. याप्रकऱणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. पोलिासंनी दिपक सिंग याच्या विरोधात फसवणूनक आणि महाराष्ट्र ठेवादारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. सोमवारी दिपक सिंग तसेच त्याच्या दोन साथीदारांना नालासोपारा येथून अटक करण्यात आली. आतापर्यंत ३५ हून अधिक तक्रारदरांनी त्याच्याविरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

हेही वाचा : वसईतील उद्योग गुजरातला स्थलांतरणाच्या मार्गावर, सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार; उत्पादनावर परिणाम

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

आरोपी हा चाळ माफिया असून चाळी बांधून देतो, स्वस्तात घरे देतो असे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. यासाठी दिशाभूल करणार्‍या खोट्या जाहिराती दिल्या होत्या असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले. ज्या कुणाला या आरोपींनी फसवणूक केली असेल त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन माणिकपूर पोलिसांनी केले आहे.