वसई: खोट्या जाहिराती देऊन फसवणूक करणार्‍या चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत ३५हून अधिक जणांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असतात, त्यामुळे चाळ माफिया सक्रीय झाले आहे. यातील दिपक सिंग हा रेल्वे स्थानक परिसरात फसव्या जाहिराती देऊन लोकांचा दिशाभूल करत होता. आपली जागा असल्याचे भासवून चाळ बांधून देण्याचे आमीष लोकांना देत होता. मात्र त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची आर्थिक फसवणकू करत होता. याप्रकऱणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. पोलिासंनी दिपक सिंग याच्या विरोधात फसवणूनक आणि महाराष्ट्र ठेवादारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. सोमवारी दिपक सिंग तसेच त्याच्या दोन साथीदारांना नालासोपारा येथून अटक करण्यात आली. आतापर्यंत ३५ हून अधिक तक्रारदरांनी त्याच्याविरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

हेही वाचा : वसईतील उद्योग गुजरातला स्थलांतरणाच्या मार्गावर, सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार; उत्पादनावर परिणाम

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai chawl mafia arrested by manikpur police for cheating many people by advertising cheap houses css
First published on: 03-07-2024 at 20:51 IST