वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होणार या भीतीने नायगांव पोलीस ठाण्याच्या आवारातच एक जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली .दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायगांवच्या वाकीपाडा येथे मोहन गोळे (५४) आणि पत्नी गीता (५०) सह राहतात. नालासोपारा येथील सुभाष उत्तेकर यांनी गोळे दांपत्याकडून १० टक्के एकूण ५ लाख रुपये घेतले होते. मात्र उत्तेकर यांनी पैसे परत न केल्याने गोळे दांपत्याने त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात मद्यपींचा हैदोस

शुक्रवारी सकाळी गोळे दांपत्य आणि उत्तरेकर या दोघांनाही नायगांव पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान गोळे दाम्पत्याने अचानकपणे सोबत आणलेले फिनाईल प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्यांना उपचारासाठी जुचंद्रच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पती पत्नीने सावकारी गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.