वसई : वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे. ही जागा प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेला लागून आहे. दोन्ही जागा एकत्र केल्यास दोनशे खाटांचे रुग्णालय उभे राहू शकणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी देखील या मागणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यातच अद्ययावत रुग्णालय नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी वसई विरार शहरात शासकीय रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात येत होते. वसई पश्चिमेच्या नवघर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ही जागा सुमारे ६० गुंठा परिसरात आहे. या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता. २०१४ पासून हा प्रस्ताव प्रलंबितहोता. यानुसार रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भातील फेब्रुवारी २०१८ मध्ये ४१ कोटी १४ लाखाचे अंदाजपत्रक आरोग्य विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले होते. परंतु अद्याप रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही. रुग्णालयाच्या कामात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे नकाशे आणि निधी मंजूर असूनही रुग्णालयाचे काम सुरू झालेले नव्हते.

cheap Ayush Ayurvedic Medicine
देशभरात स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Fill vacant posts of doctors in health department immediately says Health Minister Prakash Abitkar
आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरा- आरोग्यमंत्री
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
GBS , patients, Government , private hospitals ,
जीबीएस रुग्णांना दिलासा! खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके

हेही वाचा : वसई : पायातील धाग्यावरून लावला हत्येचा छडा, तरुणाच्या हत्या प्रकरणात तिघांना अटक

दरम्यान, रुग्णालय तयार होत आहे तर ते शंभर खाटांऐवजी २०० खाटांचे करावे असा प्रस्ताव समोर आला होता. परंतु त्यासाठी जागेची नवीन अडचण उभी राहिली होती. यासाठी आता रुग्णालयाला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा मिळाली तर एकत्रित ८० गुंठे जागेवर रुग्णालय उभे राहू शकेल अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजाराम बाबर यांनी केली आहे. त्यासाठी ते शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.

नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० गुंठे जागा आहे. त्याला लागून सार्वजनिक बांधकाम खात्याची (भूमापन क्रमांक ६४/ब/१) २४ गुंठे जागा आहे. त्या जागेवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांचे छोटे कार्यालय असून उर्वरित जागा मोकळी आहे. या दोन्ही जागा एकत्र केल्यास तेथे बहुमजली रुग्णालय उभे राहू शकेल असे बाबर यांनी सांगितले. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक अहवाल दिला असून यासंदर्भातल अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले होेते. खासदार राजेंद्र गावित यांनी देखील जागेची अडचण असल्याचे मान्य केले. शहरातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी २०० खाटांच्या रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी आचोळे येथील जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे गावित यांनी सांगितले.

हेही वाचा : चिखलडोंगरी गावातून बहिष्कृत केलेले ग्रामस्थ गावात परतले; दहशतमुक्त वातावरणात मोकळा श्वास

शासकीय रुग्णालये रखडली तर खासगी जोमात सुरू

मागील दोन तीन वर्षांपासून शहरात एकापाठोपाठ एक खासगी रुग्णलाय सुरू असताना पालिका आणि शासकीय रुग्णलयांचे काम रखडले आहे. वसईती सर डीएम पेटीट रुग्णालयाचा विस्तार रखडला आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रुग्णालयाची जागा बदलल्याने अद्याप काम सुरू झालेेले नाही. नवघर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खानिवडे रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही.

Story img Loader