वसई: आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप नपुसंक है’ असा शिक्का असून तो आधी त्यांनी पुसावा मग इतरांवर टिका करावी, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी वसईत केले. यावेळी आदित्य यांचा उल्लेख ‘पेंग्विन ठाकरे’ असा केला. हिंदूंचे सण साजरे करायचे असतील, हिंदू मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मते द्या, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी त्यांनी वसई आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जहरी टिका केली. आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप नपुंसक आहे’ असा शिक्का आहे. तो शिक्का त्यांनी आधी पुसावा मग इतरांच्या कपाळावर गद्दार वगैरे म्हणावे अशी टिका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पेंग्विन ठाकरे असा केला. श्रध्दा वालकर हत्याकांड, साधूंची हत्या आदींची पुनरावृत्ती नको असेल तर मोंदीना सत्तेवर आणा. जर कॉंग्रेसला सत्तेवर आणले तर हिंदूंचे सण देखील साजरे करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : स्थानिक माणूस टिकविण्यासाठी बविआला पाठिंबा, हरित वसईचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांची घोषणा

स्थानिक प्रश्नांबाबत राणे अनभिज्ञ

नितेश राणे यांना पालघर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर शनिवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र एकाही स्थानिक प्रश्नांवर त्यांना बोलता आले नाही. मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो एवढच उत्तर ते देत होते. या पत्रकार परिषदेच भाजप वसई विरार जिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख मनोज बारोट, भाजपाचे नालासोपारा विधानसभा संघटन राजन नाईक आणि वसई विधानसभा संघटक मनोज पाटील उपस्थित होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai nitesh rane criticizes aditya thackeray on uddhav thackeray css