वसई: पहिल्या पावसात वसई विरार शहरात दोन तरुणांचा बळी गेली आहे. पहिल्या घटनेत विरारच्या अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या घटनेत नालासोपारा येथे पालिकेच्या पथदिव्यामुळे वीजेच्या धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पावसाळा सुरू होताच वसईतील समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावू लागतात. रविवारी पावसाला सुरवात झाल्यानंतर पर्यटकांची वसईतील विविध समुद्रकिनार्‍यावर गर्दी झाली होती. वसईच्या गावराईपाडा येथे राहणारा देवराय राय (१९) हा तरुण आपल्या मित्रांसमवेर रविवारी दुपारी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता. तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाला. संध्याकाळी उशीरा त्याचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा : वसई: राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, काँग्रेसने खानिवडे टोल नाका बंद पाडला

दुसर्‍या घटनेत नालासोपारा येथे वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होेते. रात्री साडेनऊच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या महेशपार्क परिसरात साचलेल्या पाण्यातून रोहन कासकर (२९) हा तरूण जात होता. तेथे असेलल्या पालिकेत्या पथदिव्याला त्याने आधार घेतला. मात्र पथदिव्यात पाण्यामुळे वीजेचा प्रवाह होता. त्या झटक्याने रोहन खाली फेकला गेला. स्थानिकांनी त्याला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.