वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला धडक लागून भीषण अपघात घडला आहे. बुधवारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून एम एच ४७ के ५८३४ क्रमांकांची कार ही मुंबईच्या दिशेने जात होती. याच वेळी कारचा पुढचा टायर फुटला आणि कार अनियंत्रित होऊन गुजरात वाहिनीवर पलटी झाली त्याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ०३ डी झेड ५३०५ या क्रमांकाच्या दुचाकीची कारला जोराची धडक लागली यात दुचाकीचालक व सहप्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इरफान सिद्दकी (वय ३६ रा. मुंब्रा) व नावेद शेख (वय ३० रा. गोवंडी, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे मांडवी पोलिसांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते गिळंकृत, राडारोड्याच्या ढिगाऱ्यामुळे ये-जा करण्याचे मार्ग बंद

तर कार मधील बसलेले पाच प्रवासी हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घडलेल्या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.