वसई : आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीदेखील तेवढी बुध्दीमत्ता असावी लागते. मात्र नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकारामुळे हा समज खोटा ठरला आहे. केवळ ७ आणि १० नापास असलेल्या तरुणांनी चक्क वस्तू सेवा कर (जीएसटी) विभागाला कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. बनावट कंपन्या उघडून त्यांनी १०० कोटींची उलाढाल दाखवली आणि जीएसटीकडूनच कोट्यावधी रुपये उकळले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा रोडच्या काशिमिरा परिसरात असणार्‍या हाटकेश विभागातून बनवाट कंपन्या सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेला मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांना हा बनवाट कंपनी घोटाळा आढळून आला. आरोपींनी कागदोपत्री कंपन्या स्थापन केल्या होत्या आणि त्यांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल दाखवली होती. त्या आधारे वस्तू सेवा कर विभागाकडून परताव्याच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपये उकळले होते. आऱोपींनी किमान १८ ते २० बनवाट कंपन्या स्थापन करून त्यांची वार्षिक उलाढाल १०० कोटीं एवढी दाखवली होती.या प्रकऱणी आशुराम रबानी (२५), नानजीराम रबानी (२८) आणि पर्वीण कुमार रबानी (२५) या तिघांविरोधात काशिमिऱा पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र हा घोटाळा कित्येक पटीने मोठा असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभिर्य पाहून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा… “…आता मुनगंटीवारांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, वाघनखांवरून बच्चू कडूंची टोलेबाजी

आम्ही आता पर्यंत आशुराम रबानी या एका आरोपीला अटक केली आहे. वस्तू सेवा कर विभागाकडून माहिती मागवली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाम आपेट यांनी दिली.

हेही वाचा… ‘सॅम बहादुर’ कोण होते?

आरोपी केवळ ७ वी नापास

याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा मास्टर माईड आशुराम रबानी हा केवळ ७ वी नापास आहे. आरोप हे आयफोन १४, फॉर्च्युनर अशा महागड्या गाड्या वापरत आहेत. जीएसटी च्या प्रक्रियेत असलेली त्रुटी त्यांनी ओळखली आणि मागील २ वर्षांपासून ते हा गैरव्यवहार करत आहेत. आरोपी मुळचे राजस्थानचे आहेत. सध्या तरी ५ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून घोटाळ्याची रक्कम अनेक कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. केवळ घरातून आरोपी हा घोटाळा करत होते. पोलिसांनी अनेक कंपन्यांचे रबरी शिक्के, लेटर हेड, कागदपत्रे, संगणक, प्रिटंर आदी साहित्य जप्त केले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai the seventh failed youth cheated the gst for crores of rupees asj
Show comments