वसई: वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्फत रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू होते. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास रुळावर लोकल आली.

हेही वाचा : भाईंदर : मीरा रोडमध्ये मिरवणूकीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

लोकल आल्यानंतर नेमकी गाडी कोणत्या रुळावर येईल असा गोंधळ कर्मचाऱ्यांचा झाला. याच वेळी गाडीची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वासू मित्र (५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (३७), सचिन वानखेडे (३७) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.