वसई: वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे दोन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी तीन च्या सुमारास ही घटना घडली.नसीम रियाजअहमद चौधरी (१३), सोपान सुनिल चव्हाण (१४) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदाणी आहेत. पावसाळा असल्याने या खदाणी पाण्याने भरून गेल्या आहे. गुरुवारी दुपारी गांगडीपाडा येथे राहणाऱ्या चार ते पाच जणांचा ग्रुप अंघोळीसाठी खदाणीत गेले होते. अंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने खदाणीत बुडाले. याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नदी, तलाव, खदाणी, धबधबे अशा ठिकाणी  बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
ghatkopar 8 year old boy died after fell in water tank boys father alleges society
घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा

हेही वाचा : वसई: भरावासाठी मातीऐवजी राडारोडा; भूमाफियांकडून महसूल परवान्याला बगल

यापूर्वीच्या घटना

  • विरारच्या जीवदानी परिसरात खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या कल्पेश राठोड (२५) याचा मृत्यू झाला होता.
  • १५ जुलै २०२४ ला नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या अंशु संजय बिडलान (१२) व आर्यन गोपीनाथ यादव (११) या दोन मुलांचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता.

Story img Loader