वसई : वसई विरार शहरातील पोलीस दलात फेरबदल करण्यात आले असून तीन पोलीस ठाण्यान नवीन पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मांडवी मध्ये संजय हजारे, अर्नाळा सागरी मध्ये विजय पाटील तर माणिकपूर पोलीस ठाण्यात राजू माने यांची वरीष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ३ परिमंडळे असून एकूण १७ पोलीस ठाणी आहेत. २ वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या पोलीस अधिकार्याची नियमानुसार बदली करण्यात येते. त्यानुसार मांडवी, माणिकपूर आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा : वसई : सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना राज्य शासनाचा पुरस्कार
विरार येथील मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांची परवाना शाखेत बदली करण्यात आली आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांची मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५२ च्या कलम २२ (न) मधील सुधारीत स्पष्टीकरणानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत
शहरात ३ नवीन पोलीस अधिकारी
मांडवी पोलीस ठाण्यात संजय हजारे, माणिकपूर पोलीस ठाण्यात राजू माने तर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात विजय पाटील यांची वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी संजय हजारे हे परवाना शाखेत, विजय पाटील हे पेल्हार पोलीस ठाण्यात तर राजू माने नियंत्रण कक्षात कार्यरत होते.