वसई : वसई विरार मधील ६ बेकायदेशीर पॅथोलॉजी लॅबवर तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. यासंदर्भात पालिकेने पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई करण्यासाठी पोलीस चालढकल करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई विरार शहरात खासगी लॅब मधून रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ नुकताच उघडकीस आला होता. ६ खासगी लॅबमध्ये डॉक्टर राजेश सोनी याच्या स्वाक्षरीने रक्त, मलमुत्र तपासणीचे अहवाल दिले जात होते. विशेष म्हणजे सोनी याची मान्यता रद्द झाली असताना देखील तो स्वाक्षरी करून अहवाल देत होता. यामुळे रुग्णांना चुकीचे अहवाल जाऊन त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पालिकेने त्या ६ खासगी लॅबचालकांना नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र बेकायेदशीरपणे स्वाक्षरी करणारा डॉक्टर राजेश सोनी आणि ६ लॅब चालकांवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा : वसई : १० वर्षांनंतर पालिकेचा घनकचरा प्रकल्प सुरू, कचराभूमीतील साचलेल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

याबाबत मुंबईच्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. श्रीजी पॅथोलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टीक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरी, ग्लोबल केअर ॲण्ड वेल्फेअर डायग्नोस्टिक सेंटर आणि धन्वंतरी या लॅबमध्ये गुजरातच्या मान्यता रद्द झालेल्या डॉक्टरच्या स्वाक्षरीचा अहवाल कसा दिला जात आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार खरा असल्याचे मान्य केले. मान्यता रद्द असताना गुजरातमध्ये बसून ६ लॅब चालकांना अहवाल देणार्‍या डॉक्टर राजेश सोनी याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल)ला दिले. तसेच संबंधित ६ लॅब चालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

हेही वाचा : वसई : अर्नाळा पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांना आग, १२ चारचाकी जळून खाक

६ लॅब बंद, पोलिसांकडून कारवाईसाठी चालढकल

या सर्व ६ खासगी लॅब बंद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र स्थानिक पोलिसांना वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी आता पोलीस आयुक्तांनाच तक्रार केली आहे. याप्रकरणी एकूण ५ वेळा पत्रव्यवहार केला होता तरी कारवाई केलेली नाही, असे या पत्रात म्हटले आहे. कारवाई करण्यासाठी पालिकेने विधानसभेतील तारांकीत प्रश्नाचाही हवाला दिला आहे. त्यामुळे आता पोलीस कधी कारवाई करतात त्याकडे लक्ष लागले आहे.