वसई: विरारच्या ग्लोबल सिटी परिसरातील कल्पवृक्ष या रहिवासी संकुलातील इमारतीत एका सदनिकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात कल्पवृक्ष रहिवासी गृह संकुल आहे. या इमारतीत गुरुवारी रात्री अचानक पणे एका बंद असलेल्या सदनिकेला आग लागली. या घटनेमुळे इमारतीमध्ये खळबळ उडाली होती. धुराचे व आगीचे मोठं मोठे लोळ पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलिसांना व पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

A dog was strangled and killed at an animal shelter Pune news
पिंपरी : सांभाळण्यासाठी दिलेल्या श्वानाला डांबून ठेवून ठार मारले
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
massive fire broke out in a warehouse in a residential building in nalasopara
नालासोपाऱ्यात निवासी इमारतीत असलेल्या गोदामाला भीषण आग
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
massive fire at mandai metro station
मंडईतील मेट्रो स्थानकात भीषण आग, वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने फोमला आग
Delhi blast near CRPF school
दिल्लीत CRPF च्या शाळेजवळ मोठा स्फोट, रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण; पहाटे नेमकं काय घडलं?
santoshi mata mandir chembur
मुंबई: चेंबूरमधील मंदिरात भीषण आग
Fire Destroys Five Houses and Shop in ghorpade peth
घोरपडे पेठेत जुन्या वाड्यात आग; पाच घरे, दुकानाला झळ

हेही वाचा : भाईंदर, वसईतील ३६ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, १९ पोलीस ठाण्यातील १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले

नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसून घराचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आगीची दुर्घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहे. यापूर्वी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे साडी कंपाऊंड परिसरात एक रहिवासी इमारतीत लग्न मंडप व डेकोरेशन साहित्य ठेवण्याच्या गोदामाला व वसई पूर्वेच्या मधूबन परिसरात कर्मा हाईड्स १५ मजली इमारतीमध्ये उदवाहक (लिफ्ट) मध्ये शॉट सर्किट होऊन आग लागली होती.