वसई : विरार मधील मोबीन शेख याच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मात्र या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. विरार पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील आशियाना इमारतीत मोबीन शेख (४२) हा पत्नी आणि मुलांसह राहतो. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला आणि त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी खिडकीतून गोळी झाडली.
हेही वाचा : पुण्यात ३ पोलिसांनी केला थरारक पाठलाग, सुधीर सिंग हत्या प्रकरणात ६ जणांना अटक
मात्र झाडलेली गोळी खिडकीतून भिंतीला लागली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. फिर्यादी मोबीन शेख हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याच्यावर यापूर्वी देखील ॲसिड हल्ला झाला होता.