वसई: एसटी महामंडळाच्या चालत्या एसटीचे चाक निखळल्याची घटना वसईत घडली आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघोली येथे ही घटना घडली. चालक व प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. विरारच्या अर्नाळा आगारातून एमएच १४ बीटी २७१८ या क्रमांकाची  एसटी येथे प्रवाशांना घेऊन निघाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘त्या’ चावी विक्रेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलिसांनी सूडबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप

निर्मळ वाघोली जवळील परिसरातून प्रवास सुरु असतानाच अचानकपणे पुढील बाजूचे चाक निखळल्याची घटना घडली. बस एका बाजूने झुकत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी चालकाला बस थांबविण्यास सांगितल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या एसटी मध्ये २० ते २२ प्रवास करीत होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एसटीची योग्य ती दुरुस्ती केली जात नसल्याने अशा घटना घडतात. अशा घटना घडू नये यासाठी बसेसची तपासणी करूनच सेवेसाठी मार्गावर पाठवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.