वसई : वसईच्या सनसिटी येथे दुचाकीला चारचाकीची धडक लागून अपघात घडला आहे. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात अमित मनोज सैनी ( २०) तरुणाचा मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.

वसई पूर्वेच्या गोखिवरे येथील फादरवाडी येथे राहणारा अमित सैनी (१८) हा मंगळवारी दुपारी वसई सनसिटी रस्त्यावरून दुचाकीवरून जात होता. दुपारी ३ च्या सुमारा मागून येणार्‍या चारचाकी चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अमित हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. चालक तरुण पांडे (२९) याने त्याला उपचारासाठई वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान अमित या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : Video: भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राची ट्रेनखाली आत्महत्या

तरुण पाडे हा व्यवसायाने वाहनचालक आहे. त्याला आम्ही अटक केली आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. मयत अमित सैनी याने नुकतीच १२ वीची परिक्षा दिली आहे.

Story img Loader