पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलीची हत्या करून एका इमसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विरार पूर्वेच्या ग्लोबल सिटी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

उदयकुमार काजवा (५२) हा इसम पत्नी वीणा (४२) तसेच शिवालिका (५) आणि वेदांत (११) या दोन मुलासंह विरारच्या ग्लोबल सिटी येथील मैत्री पार्क मध्ये रहात होता. सोमवारी सकाळी त्याने पत्नी वीणा आणि ५ वर्षांची शिवालिका यांची गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळफास लावून आत्महत्या केली. बोळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदयकुमार हा बेरोजगार होता. त्याची पत्नी वीणा खासगी शिकवणी घेऊन घर चालवत होती. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखिची होती. त्याचच वीणाला कर्करोगाची लागण झाली होती. मुलगी शिवालिका ही गतीमंद होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यात हे कृत्य केले असावे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी दिली.

मुलगा शाळेत गेल्याने बचावला

मंगळवारी वेदांत शाळेत गेला होता. त्यावेळी उदकुमार याने पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली. वेदांत घरी आल्यावर घर बंद होते. त्यामुळे त्याने शेजार्‍यांकडे रात्र काढली. शेजार्‍यांनी रात्री पोलीस ठाण्यात काजवा कुटुंबिय बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. बुधवारी पोलिसांना तपास करत असता घरात तिघांचे मृतदेह आढळले.

Story img Loader