वसई : विरार मध्ये भर रस्त्यात १४ वर्षीय मुलीचा अनोळखी तरुणाकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. अल्पवयीन मुलींना अडवून त्यांच्यावर लैंगिक अत्यातार करणारे विकृत म्हणजेच सिरियल मॉलेस्टर पुन्हा सक्रीय झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. सध्या बोळींज पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या विकृताचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार पश्चिमेला राहणारी एक १४ वर्षांची मुलगी शालेय साहित्य घेण्यासाठी दुकानात गेली होती. रात्री ९ च्या सुमारास एका अनोळखी तरुणाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर तिने आईला हा प्रकार सांगितला. आईने तात्काळ विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संऱक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा… नालासोपार्‍यातील संतोष भवनमध्ये बनणार नवीन पोलीस ठाणे

हा अनोळखी तरुण २० ते २२ वर्षांचा आहे. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती बोळींज पोलिसांनी दिली.

पुन्हा सिरियल मॉलेस्टरची दहशत?

या घटनेमुळे परिसरातील पालक आणि मुलींमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारे सिरियल मॉलेस्टर (विकृत) सक्रीय झाले होते. हा तसाच प्रकार असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मात्र ती शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या एकच तक्रार प्राप्त झाली आहे. अन्य ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडल्यावर त्याला सिरियल मॉलेस्टर म्हटले जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

हे ही वाचा… भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

मागील वर्षा नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घडल्या होत्या. या प्रकऱणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१८ मध्ये देखील अशाच नालासोपारा शहरात अशाच एका विकृाची (सिरियल रेपिस्ट) दहशत पसरली होती. रेहान कुरेशी नावाचा विकृत रस्त्यात शाळकरी मुलींना अडवून त्यांना आडमार्गाला नेऊन विनयभंग तसेच बलात्कार करत होता. नालासोपार्‍यातील अनेक मुलींवर त्याने अशा प्रकारे अत्याचार केले होते. मात्र फक्त ३ मुलींनी तक्रारी दिल्या होत्या. मुंबई, नवी मुंबई ठाणे,मीर रोड, भाईंदर येथील २०० हून अधिक मुलींवर त्याने अशाप्रकारे लैगिक अत्याचार केल्याची उघड झाले होते.होते. दोन वर्षे त्याची दशहत होती. नंतर त्याला गुन्हे शाखेने अटक केली होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In virar minor girl molested on street asj