कोचिंग क्लासेस मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या प्रमोद मोर्या या शिक्षकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केली. बुधवार सकाळी विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथे ही घटना घडली. संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत हा आरोपी शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील सह्याद्री नगरमध्ये प्रमोद मोर्या हा एक खाजगी कोचिंग क्लास चालवतो. यामध्ये सातवीत शिकणार्‍या १३ वर्षीय मुलीचा मागील आठवड्यात शिक्षक लैंगिक छळ करत होता. त्यामुळे ती घाबरून दोन दिवस क्लासला गेली नव्हती. ती क्लासला का जात नाही म्हणून तिच्या पालकांनी तिला विचारणा केली तेव्हा तिने हा प्रकार सांगितला. त्यामुळे तिचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक क्लास मध्ये गेले आणि शिक्षक प्रमोद मोर्या याला बेदम चोप देत भर रस्त्यात धींड काढली. या मारहाणीत मोर्या रक्तबंबाळ झाला आहे.

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
pune dance teacher sexually assaulted minors at school in Karvenagar
नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

या शिक्षकाने ३-४ मुलींचा यापूर्वी असाच लैंगिक छळ केला आहे. पण अन्य मुली घाबरतात याची चौकशी करा आणि आरोपीला कडक शिक्षा करा अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. आम्ही मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहे. हा नागरिकांच्या संतपाचा उद्रेक होता म्हणून त्याला बेदम मारहाण करत धिंड काढली, असे स्थानिक कार्यकर्ते मनिष राऊत यांनी सांगितले.

हे ही वाचा… Maharashtra News Live : दोन तासांनंतर आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर पडले, मविआ आता मुंबईत जोडे मारो आंदोलन करणार

नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली.

Story img Loader