वसई : शहरातील सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश आहे. यामुळे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांत सायबरविषयक तक्रारी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

डिजिटल युगात सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करम्णे, समाजमाध्यमांवर अश्लील छायाचित्रे प्रसारित करून बदनामी आणि खंडणी उकळणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे अशा प्रकरणात आरोपींना पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्षात मागील वर्षांत (२०२१) यासंबंधी ७९४ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ६९३ तक्रारींचे निराकरण सायबर कक्षाने केले, तर १३८ प्रकरणे ही संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस ठाण्यांना सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी स्वीकारून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे हाताळणीचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी ही माहिती दिली.

ऑनलाइन फसवणुकीपासून, बदनामीकारक मजकूर ते लैंगिक छळापर्यंत गुन्ह्यांचा समावेश सायबर गुन्ह्यांमध्ये होतो. सायबर भामटे विविध प्रकारे ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करताना दिसतात. इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरून सर्वात जास्त बदनामी केली जात असल्याच्या घटना आढळल्या आहेत. अश्लील छायाचित्रे प्रसारित करणे, बनावट खाते उघडून बदनामी करणे, खंडणी उकळणे आदी प्रकार विकृत गुन्हेगारांकडून होत असतात.   

महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ५० हजार ३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात उत्तर प्रदेश अग्रेसर असून त्यापाठोपाठ कर्नाटकचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद होणाऱ्या राज्यात महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रात ५ हजार ४९६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच नोंद झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी १०.९८ टक्के सायबर गुन्हे होते.

Story img Loader