विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणाची सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. यासाठी पालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नाशिक जलसंपदा विभागाला निधी दिला आहे. पुढील महिन्यात या धरणाची सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याचे, पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची साधारण २५ ते ३० वर्षांनंतर सुरक्षा तपासणी करणे गरजेचे आहे. पाण्याच्या साठवणुकीमुळे धरणावर होणारे परिणाम लक्षात घेता धरणाची सुरक्षा तपासणे आवश्यक असते. नालासोपारा परिसरात असलेले पेल्हार धरण महानगरपालिकेच्या मालकीचे असून त्यास ४० वर्षे झाली आहेत. यामुळे त्याची सुरक्षा चाचणी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच पालिकेने ही तपासणी हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाशिक जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ही पाहणी करण्यात येणार आहे.

या धरणाची आयुर्मर्यादा पाहता वसई-विरार महापालिकेने या धरणाच्या सुरक्षा तपासणीची गरज व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने या धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करून अहवाल देण्याकामी सुरक्षा समितीस कळविले होते. धरण तपासणीकामी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागाच्या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी २ लाख ५५ हजार ९० रुपये इतके शुल्क भरण्यास सांगितले. महापालिकेने या शुल्काचा भरणा केला आहे. पालिकेच्या ५ ऑक्टोबर २०२१च्या याबाबतच्या ठरावास तत्कालीन आयुक्तांनी मान्यताही दिलेली आहे.  पुढील महिन्यात ही तपसणी केली जाणार आहे.

धरणाची क्षमता पेल्हार धरण हे मातीचे आहे. लघु पाटबंधारे विभागामार्फत १९७४ साली हे धरण बांधण्यात आले. त्याची क्षमता ३.६८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. बंधाऱ्याची लांबी ४३० मीटर इतकी व उंची २६ मीटर आहे. या धरणातून पालिकेला प्रतिदिन १० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत आहे.