वसई:  बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची वाहने घेऊन फरार झालेल्या टोळीतील ७ जणांना आचोळे पोलिसांनी  अटक केली आहे. तब्बल चार महिने ही टोळी पोलिसांना चकमा देत होती. या टोळी कडून सव्वा दोन कोटींच्या १२ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

बनावट कागद पत्रांच्या आधारे बँका कडून वाहन कर्जे घेऊन पसार होणाऱ्या एका टोळीने धुमाकूळ घातला होता. ऑक्टोबर महिन्यात नालासोपारा मध्ये एक प्रकरण उघडकीस आले होते. व्यापारी जगदीश माळी यांची ठकसेन  राहुल शहा याने २ कोटींचे कर्ज मंजूर करवून देतो तसेच महागड्या गाड्या विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार कर्ज मंजूर करून तसेच गाड्या फिर्यादीला न देता त्यांची फसवणूक केली होती.या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी ८ जणांविरोधात ४०२, ४२०,४६५ ४४७, ४७१ तसेच १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र मुख्य आरोपी राहुल शहा आणि त्याचे साथीसार फरार होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेत होते.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

हेही वाचा >>> शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करण्यास भाजपचा नकार; लोकसभेच्या उमेदवारीवरून मिरा भाईंदर भाजप मध्ये असंतोष

नाव बदलून पोलिसांना दिला चकमा

गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल शहा हा पोलिसांना चकमा देण्यासाठी ओळख बदलून रहात होता. त्याने बनावट आधारकार्ड व त्यावर स्वतःचे नाव बदलून सुरेश भगत असे केले होते. तो कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व नेपाळ अश्या वेगवेगळ्या राज्यातील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करीत होता. दरम्यान, आरोपी राहुल हा पवईतील एका पंचतारांकित  हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला तेथून अटक केली. त्याच्याकडून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे असलेली ८ सिमकार्ड, नेपाळचे १ सिमकार्ड, २ लॅपटॉप, १ आयपॅड, ९ मोबाईल, ३ बनावट आधारकार्ड, फेडरल व टीएनबी बँकेच्या बनावट ‘ना हरकत दाखला’ (एनओसी) आढळून आले. त्यानंतर या टोळीतील विजय सिंग, भिकाजी उर्फ उमेश गोपाळे, मोहम्मद नजर खान, प्रवीण उर्फ राणू जैन, आकाश मुसळे आणि विवेक करंडे या अन्य ६ आरोपींना अटक केली. त्यांच्या कडून २ कोटी ३४ लाख ५३ हजार रुपयांच्या १२ महागड्या कार जप्त केल्या आहेत,

या टोळी कडून फसवणुकीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर टोळीचा म्होरक्या राहुल शहा याच्याविरोधात नालासोपारा, मुंबई आणि गुजरात मध्ये फसवणुकीचे १२ गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार , पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, तपास पथकाचे सपोनि यशपाल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.