सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई- विरार मधील म्हाडा वसाहतीमधील एका इमारतीच्या सदनिकेत आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू असल्याचे समोर आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेने या सदनिकेत छापा घालून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी एका बांग्लादेशी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने मागील दोन वर्षात ३०० हून अधिक मुली देहव्यावापारासाठी बांग्लादेशातून मुंबईत आणल्याचे तपासात समोर आले आहे.

विरार पश्चिमेला बोळींज येथे म्हाडाची वसाहत आहे. यातील डी-७ इमारतीच्या सदनिका क्रमांक २१०४ मध्ये आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा घालून या फ्लॅट मधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली. अन्य दोन मुलींना नालासोपारा येथील प्रगतीनगर मधून अटक करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा सुत्रधार आरोपी अशोक दास असून तो बांग्लादेशी आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने तो बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसववून देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता. बांग्लादेशातून मुली आणल्यानंतर या फ्लॅटमध्ये ठेवायचा. त्यानंतर या मुलींना मुंबईच्या ग्रॅंट रोड येथील रेड लाईट एरिया मध्ये देहव्यापारासाठी पाठवत होता. त्याच्या अन्य साथाीदारांचा शोध सुरू आहे.मागील दोन वर्षात त्याने ३०० हून अधिक बांग्लादेशी मुलींना फसवून मुंबईत देहव्यापारासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले.

आणखी वाचा-प्रेयसीने घरी बोलावले, आईने केला चाकूने हल्ला; जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

म्हाडा वसाहत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट केंद्र

या प्रकरणातील आणखी धक्कादायक म्हणजे देहव्यापारासाठी म्हाडाच्या घरांचा होत असलेला वापर. बांग्लादेशातून आणलेल्या मुली म्हाडाच्या घरात ठेवल्या जायच्या आणि तेथून त्या मुंबईत पुरवल्या जात होत्या, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी याने दिली. आरोपीने डी-७ इमारती मधील २१०४ क्रमांकाचा फ्लॅट करारनामा करून घेतला होता आणि त्याचा वापर देहव्यापारासाठी करायचा. मुळात म्हाडाची घरे भाडेतत्वावर देताना म्हाडाचा ना हरकत दाखला लागतो. याशिवाय पोलिसांनी पडताळणी करून ना हरकत दाखला (एनओसी) द्यायची असते. या नियमांचे पालन न झाल्याने म्हाडाच्या घरांचा वापर देहव्यापारासाठी होत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. आम्ही करारनामा जप्त केला असून संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.