वसई- नालासोपारा येथे बनावट जन्म दाखला तयार केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी एका महिलेसह दाखला बनविणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा येथील आचोळेमध्ये राहणाऱ्या यासीम वसीन खान या तरुणीने पारपत्रासंदर्भात आचोळे पोलीस ठाण्यात कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांची पोलिसांमार्फत पडताळणी केली जात असताना जन्म दाखला बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. या तरुणीचा जन्म आचोळे रुग्णालय असताना जन्मस्थळ मुंबई येथील महापालिकेचे रुग्णालय असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता हा दाखला बनावट असल्याचे कबूल केले. हा दाखला तिने नालासोपारा येथील शाहिन एण्टरप्रायझेस या दुकानातील फैय्याज शेख याच्याकडून बनवून घेतला होता.

हेही वाचा – वसई : स्वाभिमानी वसईकर संस्थेचे व्हिक्टर मच्याडो यांचे निधन

हेही वाचा – विरारच्या लॅबमधील अहवालावर नवी मुंबईच्या डॉक्टरची सही, पालिकेकडून चौकशी सुरू

या प्रकरणी यासिन शेख आणि फैय्याज शेख यांच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच बनवाट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आणखी कुणाचे अशा प्रकारचे दाखले तयार केले आहेत का त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It has come to light that fake birth certificate has been prepared in nalosapara a case has been registered against two including the young woman ssb