वसई: वसई भाईंदर रोरो सेवेचा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. असे असताना दुसरीकडे मात्र  मागील सात वर्षांपासून विरारच्या अर्नाळा व अर्नाळा किल्ला या भागातील जेट्टीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे आजही येथील नागरिकांना फेरीबोटीतून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. हा परिसर बेटावर असल्याने या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो.किनाऱ्यावर जेट्टी नसल्याने ही फेरीबोट समुद्रातच थांबवून गुडघाभर पाण्यातून ये जा करावी लागत आहे. या धोकादायक प्रवासातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जेट्टी तयार करण्याचे काम २०१७  मध्ये सुरू करण्यात आले होते.

अर्नाळा किल्ला व अर्नाळा किनारा अशा दोन्ही टोकावर या जेट्टी तयार करण्यात येत आहेत यासाठी सुमारे २६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.या जेट्टीचे काम अगदी कासवगतीने सुरू असल्याने जवळपास सहा ते सात वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी नाही. या जेट्टीचे काम पूर्ण झाले.

हेही वाचा >>> मॉडलिंगच्या नावाखाली अनेक तरुणींचा लैंगिक आणि आर्थिक छळ; आरोपीला १० वर्ष कारावासाची शिक्षा

आजही येथील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन बोटीतून चढ उतार करून धोकादायक प्रवास करावा लागतो. शाळकरी मुले, महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांची परवड होते. त्यामुळे ही जेट्टी पूर्ण होणार तरी कधी प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नुकताच महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई भाईंदर असा रोरो सेवेचा प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण ही केला.परंतु मागील सहा ते सात वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असलेल्या अर्नाळा जेट्टीच्या कामाला विलंब का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

दररोज अर्नाळा किल्ला व अर्नाळा या भागातून मोठ्या संख्येने प्रवासी ये जा करतात त्यासाठी असलेली फेरीबोट व्यवस्थित पणे उभी राहावी यासाठी जेट्टी महत्वाची तीच अजूनही अपूर्ण असल्याने येथील ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत.

अर्नाळा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा

कोकण विभागाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून रोरो सेवा यासारखे प्रकल्प हाती घेऊन पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही स्वागतार्ह बाब आहे परंतु विरारच्या पश्चिमेला ऐतिहासिक जंजिरे अर्नाळा किल्ला आहे.  आजही हा किल्ला पाहण्यासाठी दुर्गमित्र व पर्यटक विविध भागातून येतात.त्यांना ही या धोकादायक रित्या फेरी बोटीतून चढ उतार करून प्रवास करावा लागतो. जर जेट्टी पूर्ण झाली तर येथून बोटीने प्रवास सुलभ होईल. याशिवाय येथील पर्यटनाला ही चालना मिळेल असे नागरिकांनी सांगितले आहे.

अर्नाळा जेट्टीचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अजूनही प्रवासा दरम्यान अडचणी येतात. येथील ग्रामस्थांचे होणारे हाल लक्षात घेता तातडीने हे काम पूर्ण करून दिलासा द्यावा निनाद पाटील, सामाजिक कार्यकर्ते

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jetty work incomplete at arnala fort island zws