लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : ९ वर्षांपूर्वी झालेल्या विरारमधील कविता बाडला या तरुणीच्या अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणात गुरूवारी वसई सत्र न्यायालयाने एका महिलेसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मे २०१६ मध्ये ३० लाखांच्या खंडणीसाठी कविताचे अपहरण करण्यात आले होते. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून जाळण्यात आला होता.

Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Rhona Wilson
रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना जामीन; शहरी नक्षलवाद प्रकरण
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी

कविता बाडला (२७) ही तरुणी नोकरी लावणार्‍या प्लेसमेंट कंपनीत काम करत होती. १५ मे २०१६ रोजी तिचे अपहरण करण्यात आले होते. त्याच दिवशी तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर डहाणूच्या कासा रोडवरील साखरा घाटीत तिचा मृतदेह एका सुटकेस मध्ये टाकून जाळण्यात आला होता. तिची हत्या केल्यानंतर तिच्याच मोबाईलवरून आरोपींनी कविताच्या वडिलांकडून ३० लाख रुपये आणि ३ किलो सोने आदी खंडणी मागितली होती. या प्रकऱणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी मोहितकुमार भगत (२५) याच्यासह त्याचे साथीदार रामअवतार शर्मा (२६), शिवकुमार शर्मा (२५), मनीष वीरेंद्र सिंग (३६), युनिता रवी (३५) या सर्वाना अटक केली होती.

आणखी वाचा-विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका

गुरूवारी वसईच्या सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल दिला. कविताचे अपहरण करून खंडणी मागणे, तिची हत्या करणे, पुरावा नष्ट करणे आदी सर्व प्रकरणात चौघे आरोपी दोषी आढळले. आरोपींना हत्या करणे, पुरावा नष्ट करणे आदी प्रकरणात जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. महिला आरोपी युनिता सिंग हिला जन्मठेप तसेच कलम ३८६ अंतर्गत ५ वर्ष तर कलम २०१ अंतर्गत ३ वर्ष शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. याशिवाय मयत कविताच्या कुटुंबियांना ६१ हजार रुपायंची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एस व्ही खोंगल यांनी ही शिक्षा सुनावली. ॲड जयप्रकाश पाटील यांनी सरकारी वकिल म्हणून न्यायालयात बाजू मांडून युक्तिवाद केला. याप्रकरणी एकूण ५३ साक्षीदार तपासण्यात आले.

आणखी वाचा-८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम

न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य मानला. त्यात मयत कविताची बहिणी शीतल कोठारी, वडील किशनलाल कोठारी यांचे जबाब, मयत आणि आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन, मोबाईलचे सीडीआर महत्वाचे ठरले, सापळा अहवाल, असे ॲड जयप्रकाश पाटील यांनी सांगितले. तत्कालीन पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले, हेड कॉन्स्टेबल मुकेश पवार, सचिन दोरकर, मनोज मोरे, अमोल कोरे आदींच्या पथकाने आरोपींना पडकले होते. पोलीस कॉन्स्टेबल सचिन दोरकर यांनी आरोपीना पकडण्यासाठी चालक बनून सापळा लावला होता. आमच्या पोलिसांनी चांगले काम केले. आरोपींना अटक करण्याबरोबर भक्कम आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर आम्ही भर दिला होता. त्यामुळे ही शिक्षा होऊ शकली असे सांगून तत्कालीन पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी सांगितले. ९ वर्षांनी हा निकाल आला आहे. मात्र आरोपींना फाशी व्हायला हवी होती, असे मयत कविताचे वडिल किशनलाल कोठारी यांनी सांगितले.

Story img Loader