भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाचा संदेश शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आयोजित ‘किल्ला सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेचे रविवारी संपन्न झाली. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खुद्द आयुक्त, अतिरिक्त आयुक्त या मोहिमेत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवले आहे. हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने ‘किल्ला सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी ७ वाजता भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानातातून या सायकल मोहिमेला प्रारभं झाला. या स्पर्धेचा मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते धारावी जंजिरा किल्ला मार्गे पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे निश्चित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, तसेच महानगरपालिका विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत शहरभर हरित संदेश देत ५००. हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. त्यात १८-२५, २६-५० आणि ५१-६० अशा तीन वयोगटांत स्पर्धेक सहभागी झाले होते. मा आयुक्त यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राधाबिनोद शर्मा शहर अभियंता दिपक खांबित आणि अधिकारी वर्गाने सायकल शर्यतीत सहभाग नोंदवला. आयुक्तांनी स्वतः सायकलवरून संपूर्ण मार्गिकेचा प्रवास करत स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवला आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धेनंतर वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला, ज्यात उपस्थित मान्यवरांनी हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकत “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश दिला. या अनोख्या सायक्लोथॉनचा प्रत्येक सहभागी जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण जपण्याचा संकल्प करत महोत्सवाचा भाग बनला. आयुक्तांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करत त्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्यांना “वसुंधरा महोत्सव २०२५” च्या समारोप सोहळ्यात उत्कृष्ट दर्जाच्या सायकल्स देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

शहरातील नागरिकांनी पर्यावरण आणि निसर्ग याविषयी जनजागृती राबविण्यासाठी सहभाग नोंदवला आणि किल्ला सायक्लोथॉन २०२५ ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केल्याने सर्व स्पर्धकांचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आभार व्यक्त केले. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहता शहरातील नागरिकांनी पुढील उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.

“किल्ला सायक्लोथॉन २०२५” विजेत्या स्पर्धकांची नावे :

१८-२५ वयोगट (महिला)

१. केनिस डिमेलो

२. स्वरा मिठारी

२६-५० वयोगट (महिला)

१. सिद्धी वाफेलकर

२. अदिती गीते

५१-६० वयोगट (महिला)

१. मंगला पै

२. हिना पारेख

३. मीना तोलानी

१८-२५ वयोगट (पुरुष)

१. धीरज सत्रा

२. अश्विन मर्ढेकर

३. ऋषभ भोसले

२६-५० वयोगट (पुरुष)

१. रमेश कुमार
२. समसंग अर्जुन
३. सिद्धेश आडिवरेकर

५१-६० वयोगट (पुरुष)

१. राजेश म्हात्रे

२. रवी पिटर

३. अजय सुर्वे

६० वर्षांवरील (पुरुष)

१. धनंजय तेलगोटे

२. जनार्दन टेमकर

३. झेवियर्स डेव्हिड