भाईंदर :-भाईंदर मध्ये भाजपाचे पदाधिकारी राजन पांडे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात पांडे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

one terrorist killed in jammu
जम्मूत एक दहशतवादी ठार, लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार; सुरक्षा दलाचे जोरदार प्रत्युत्तर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
A large stockpile of swords koyta seized in Akkalkot crime news
अक्कलकोटमध्ये तलवारी,कोयत्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
youth was killed by minor due to a dispute over moving a bike
दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून
food delivery man knife attack, Mumbai,
मुंबई : अंगावर पाणी उडाल्याने अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्याने केला चाकू हल्ला
Malegaon four pistols seized
मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुकांसह ३१ जिवंत काडतुसे ताब्यात
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
boy who was recently released from juvenile detention center stabbed to death
अमरावतीत हत्‍यासत्र थांबेना, अल्‍पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्‍या

राजन पांडे भाजप पदाधिकारी रवी व्यास यांचा सहकारी आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पांडे हे भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली येथे गेला असता त्याचाच मित्र विनोद राजभर याने चाकूने त्यावर वार केले.यात पांडेच्या गळ्याला तसेच पोटात गंभीर जखम झाली.तसेच पांडेच्या बचावासाठी पुढे आलेला अन्य एक जण देखील जखमी झाला आहे. वेळेत पांडे याने तिथून पळ काढल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.सध्या पांडे व अन्य जखमीवर मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>> वर्सोवा पुलावरून दाम्पत्याची उडी; पतीला वाचवले, पत्नीचा शोध सुरू

आर्थिक वादातून हल्ला झाल्याचा संशय

राजन पांडे हा प्रामुख्याने भाजप १४५  विधानसभा प्रमुख रवी व्यास यांचा सहकारी आहे. व्यास जिल्हाध्यक्ष असताना त्यावार पक्षाची प्रमुख जबाबदारी  सोपवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार पांडे हा गुटख्याचा व्यापारी आहे.मागील काही दिवसापासून हल्ला करणाऱ्या विनोद राजभर सोबत त्याचा आर्थिक गोष्टींना घेऊन वाद सुरु होता. दरम्यान शुक्रवार या दोघाची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर ही घटना घडली  आहे.