वसई : कामगार नेते आणि हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्वत्र मराठी टक्का घटत चालला असून मराठी टक्का टिकविण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यायला हवं या भूमिकेतून हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे करून कामगारांना देशोधडीला लावले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई मध्ये १९९० मध्ये झालेले पाणी आंदोलन, हरित पट्टा राखण्यासाठी झालेले सिडकोविरोधी आंदोलन अशा विविध आंदोलनामुळे वसईत हरित वसईची वेगळी ओळख निर्माण झाली होती. वसईच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत हरित वसईची मोठी भूमिका आहे. यया आंदोलनाचे नेतृत्व हरित वसईचे अध्यक्ष मार्कूस डाबरे यांनी केले होते. मार्कुस डाबरे यांनी या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्वत्र स्थानिकांची गळचेपी होत आहे. स्थानिकांसह मराठी माणूस हद्दपार होऊ लागला आहे. ते टिकविण्यासाठी स्थानिक असलेल्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा…वसई : वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर पोलिसांच्या जाळ्यात

मीरा-भाईंदर सारख्या शहरातून मराठी माणूस हद्दपार होत असताना मराठी टक्का टिकवण्याचे काम वसई विरार आणि पालघर मध्ये बहुजन विकास आघाडीने करत आहे. या पक्षातील तिन्ही आमदार हे स्थानिक असल्यामुळे स्थानिकांच्या सोबतीने उभे राहणे कधीही चांगले अशी भावना डाबरे यांनी बविआला पाठिंबा देताना व्यक्त केली.

हेही वाचा…आजरपणानंतर हितेंद्र ठाकुरांचा प्रचार सुरू, वसईत सामाजिक सलोखा कायम ठेवल्याचा दावा

केंद्र शासन कामगारांविरोधी

मार्कुस डाबरे हे कामगार नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे नष्ट करून कामगारांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप त्यांनी केला. सर्वत्र कंत्राटी पद्धत तयार केली जात आहे. बेरोजगारी वाढत आहेत. कामगारांची गळचेपी करण्याचे काम मोदी सरकार करत आहे असा घणाघाती आरोपही डाबरे यांनी केला.