वसई : शहरातील तलावांच्या सुशोभीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने अमृत सरोवर ही योजना आणली आहे. पालिकेने या योजनेंअतर्गत शहरातील ३ तलवांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. या योजनेमुळे शहरातील तलावांना नवसंजीवनी मिळणार आहे. तलाव हे शहरातील सौंदर्यात भर घालत असतात तसेच ते पर्यावरणाच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावत असतात. या तलावांचे संवर्धन करून त्याने पुनरुज्जीवन करावे यासाठी केंद्र शाससाने अमृत २.० अंतर्गत अमृत सरोवर ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव तयार करणे आणि तलावांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणे, पाण्यातील जलसृष्टी वाचवणे तसेच तलावांद्वारे पर्यटनाला चालना देणे आदी उद्देशाने अमृत सरोवर योजना पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्त तलावांच्या सुभोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी ५० लाख ते ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

वसई, विरार शहरात अनेक जुने तलाव आहेत. मात्र निधीअभावी या तलावांचे सुशोभीकरण रखडले होते. परंतु आता केंद्र शासनाने निधी देण्याचे जाहीर केल्याने पालिकेने याअंतर्गत निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने विरारमधील घाणीचा तलाव, तसेच नालासोपारामधील मालई आणि नाले या तलावांचे प्रस्ताव सादर केले आहेत. मालई आणि नाळे तलावासाठी सुमारे ३८ कोटी तर घाणीच्या तलावासाठी ११ कोटींची खर्च अपेक्षित आहे.

या योजनेअंतर्गत तलावांची खोली वाढवणे, संरक्षक भिंत बनवणे, तलावांचे सुशोभीकरण करणे, तलावांच्या सभोवताली खेळाचे उद्यान तयार करणे आदींचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्यात येत असून जलकुंभ उभारण्यात येत आहे. आता या योजनेअंतर्गत तलावांचे सुशोभीकरण केले जाणार असल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ८६ कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. निधीअभावी तलावांचे सुशोभीकरण रखडले होते. परंतु केंद्राचा निधी मिळाल्याने तलवाचे सुशोभीकरण करणे तसचे जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे शक्य होणार असल्याचे पालिकेने सांगितले.

या तलावांचे सुशोभीकरण

  • घाणीचा तलाव, विरार पूर्व- ११ कोटी ३८ लाख
  • मालई तलाव, नालासोपारा पश्चिम- ३७ कोटी २० लाख
  • नाळे तलाव नालासोपारा पश्चिम- ३७ कोटी ८६ लाख

Story img Loader