लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई: वसई किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात सुद्धा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले आहे.या बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसई पश्चिमेच्या भागात वसईचा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत. या परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा संचार सुरू असल्याचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच किल्ल्याच्या परिसरात खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्य कैद झाली असून बिबट्याचा वनविभागाकडून शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
आणखी वाचा-वसई : शहराची नव्याने रचना करताना..
किल्ल्याच्या भागाला लागून ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती व कोळीवाडा आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी व सकाळी या भागातील रस्त्यावर नागरिक चालण्यासाठी जातात. आजूबाजूला घनदाट झाडे झुडपे असल्याने झुडपांमध्ये लपून बसलेला बिबट्या दिसून येणार नाही त्यामुळे नागरीकांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातून ये जा करताना, रात्रीच्या सुमारास बाहेर पडताना सावधानता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. या बिबट्याला दुचाकीस्वाराची धडक लागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा शोध वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे.
झुडपे हटविण्यासाठी पालिकेला पत्र
बिबट आढळून आलेल्या ठिकाण हे वसई-विरार महापालिका हद्दीतील आहे. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावेत याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झुडपे हटविण्यात यावी असे पत्र वनविभागाने पालिकेला पाठविले आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या घनकचरा ठिकाणी श्वान व इतर प्राणी आले तर बिबट्याचे भक्ष्य होऊ शकतात. त्यामुळे रस्त्यापासून दोन्ही बाजूस १५ फुटापर्यंत झुडपी काढून स्वच्छता करण्यात यावी असेही या पत्रात म्हंटले आहे.