वसई: ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने होणार्‍या मेजवान्यांसाठी तसेच मद्य पिण्यासाठी मद्य परवाना आवश्यक असतो.  मात्र पालघर जिल्हयात केवळ २८ जणांनीच मद्य परवाने काढले आहेत. रिसॉर्ट चालकांनी देखील मद्य परवाने काढले नसल्याने तेथील मेजवान्यांमध्ये बेकायदेशीर मद्य विक्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३१ डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या हॉटेल्स , रिसॉर्ट, फार्म हाऊस येथे मेजवान्या (पार्ट्या) आयोजित केल्या जात असतात. यामध्ये मद्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याने मद्याचा वापरही होत असतो. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी वसई विरारच्या समुद्रकिनार्‍यावर असलेल्या रिसॉर्ट आणि ढाब्यांमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करण्यात येत असते. मद्य पिण्यासाठी आणि मद्यापार्टीसाठी देखील परवाना आवश्यक असतो. यासाठी राज्य शुल्क उत्पादन विभागाकडून एकदिवसीय परवाना दिला जातो. असे असतानाही बहुतांश नागरिक परवाना काढत नाहीत. यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागत पार्टी साठी पालघर जिल्ह्यात केवळ २८ जणांनी मद्य परवाना घेतला असल्याची माहिती राज्य शुल्क उत्पादन विभागाने दिली आहे.

हेही वाचा >>> विवळवेढे उड्डाणपुलावर भीषण अपघात ; टँकर मधून रसायन गळती

पालघर जिल्हयातील सर्व अधिकृत सर्व किरकोळ देशी विदेशी विक्रीत्यांना २ आणि ५ रुपयांचे एक दिवसीय परवाने देण्यात आले आहेत. नववर्षाचे स्वागत आपण शासनाचे अधिकृत परवाना धारक असलेले परमिटरुम वार येथे साजरा करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. परवाना नसताना मद्य विक्री केल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच कलम ६९ नुसार तर विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी मद्य पिल्यास कलम ८४ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> पालघर : आदिवासी बालिकेवर विनयभंग, ५४ वर्षीय इसमावर पॉक्सो

रिसॉर्ट मध्ये बेकायदेशीर मद्य वसई विरारसह पालघरच्या किनारपट्टीवर शेकडो रिसॉर्ट आहेत. त्यांना मद्य विक्रीचे परवाने नाहीत. त्यामुळे त्यांनी ३१ डिसेंबरच्या मेजवान्यांसाठी एक दिवसीय मद्य परवाना काढणे आवश्यक आहे. २५ हजार रुपये भरून हा परवाना काढला जातो. मात्र बहुतांश रिसॉर्ट चालकांनी मद्य परवाना काढलेला नाही. त्यामुळे अशा रिसॉर्ट मधील मेजवान्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor permit in palghar district 28 people got liquor licenses zws