वसई : ऐतिहासिक वसई किल्ल्याची दिवसेंदिवस पडझड होत चालली आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले असून तटबंदीचे दगड निखळून पडत असल्याचे दिसत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ला नामशेष होईल अशी  भीती दुर्गप्रेमी, पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. या किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी दुर्गप्रेमीसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी सन १५३६  मध्ये वसईचा किल्ला बांधला होता. किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. किल्ल्याला चारही बाजूंनी ३० फुटांची तटबंदी आहे. आता ही तटबंदी ठिकठिकाणी कोसळू लागली आहे. तटबंदीवर जंगली झाडे उगवली असून त्याची मुळे खोलवर रुतली आहेत. डागडुजी होत नसल्याने तटबंदी आणि बुरूज ढासळू लागले आहे. त्यामुळे किल्ल्यात येणारे दुर्गप्रेमी, र्पयटक आणि अभ्यासक हळहळ व्यक्त करत आहे. वसईचा किल्ला हे वसईकरांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. मात्र त्याची डागडुजी होत नसल्याने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. एकेक करून हा समृद्ध वारसा नष्ट होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. किल्ल्याचा एकूण विकास करण्यासाठी केंद्राने शंभर कोटींच्या निधीची तरतूद करून किल्ला वाचवला पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या वसई किल्ल्याचे संवर्धन झाल्यास ते महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

आम्ही किल्ल्याची नियमित साफसफाई आणि डागडुजी करत असतो अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक कैलास शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी झाडे उगवल्यामुळे तटबंदीतील दगड निखळले आहेत मात्र बुरूज ढासळले नसून तटबंदी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षांत वसई किल्ल्यातील चर्चचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किल्ल्याचे संवर्धन करून त्याचा विकास कऱण्याची योजना असून त्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याची माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली.

किल्ल्याची रचना

१७८० मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांबरोबर युद्ध करून वसईचा किल्ला जिंकला होता. वसईच्या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे पाणी आहे.  गडावर जाण्यासाठी एका बाजूला जमीन असल्यामुळे ती वापरता येते. किल्ला अतिशय सुरक्षित होता. वसईच्या किल्ल्याला दहा बुरुज असून  प्रत्येक बुरुजाला नाव दिले आहे. बुरुजांची लांबी सुमारे एक किलोमीटर आहे. किल्ल्याची तटबंदी ३० फूट उंच आणि ५ फूट रुंद असल्यामुळे अतिशय मजबूत आहे. आता हे बुरूज ढासळू लागले आहेत. किल्ल्याच्या आतील पुरातन विहिरी बुजू लागल्या असून किल्ल्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने किल्ल्याचे ऐश्वर्य लयाला जाऊ  लागले आहे. केंद्र सरकारने या किल्ल्याला १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तेव्हापासून तो पुरातत्त्व खात्याकडे आहे.

Story img Loader