वसई – नालासोपारा शहरात अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणार्‍या दोन विकृतांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची एकूण ५ पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोन विकृत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार शहरात दोन विकृत आरोपी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून मोकाट फिरत आहेत. यामुळे पालकांमध्ये आणि मुलींमध्ये घबराट पसरली आहे. २०१८ मध्ये रेहान कुरेशी नावाचा विकृत अशाच प्रकारे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत होता. त्याच प्रकारे हे दोन आरोपी मुलींना रस्त्यात गाठून त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. या आरोपींची छायाचित्रे तुळींज पोलिसांनी प्रसिद्ध केली होती तसेच त्यांची माहिती देणार्‍यांना बक्षीसही जाहीर केले आहे.

हेही वाचा – नऊ नवीन आरटीओ कार्यालयांच्या जबाबदारींचे वाटप, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी तुळींज पोलीस, गुन्हे शाखा २ आणि गुन्हे शाखा ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि तुळींज पोलिसांच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची ५ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. शहरात सर्वत्र या आरोपींचा कसून शोध घेत आहे. मुलींवर अत्यातार करून जात असतान या आरोपींचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले आहे. त्या आधारेदेखील आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा – रायगड : पेण शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम रखडले

नागरिकांचा संताप

या दोन विकृत आरोपींची बातमी लोकसत्ता वसई विरार सहदैनिकात बुधवार २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपींना पकडून कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.