भाईंदर :- उत्तनच्या जंजिरे धारावी किल्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानात जिल्हाधिकारी मार्फत ‘हॅलीपॅड’ची उभारणी केली जात आहे.मात्र या भागात मासळी सुखवण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी ही एकमात्र जागा असल्याने यास स्थानिक नागरिकांनी कडाकून विरोध केला आहे.
हेही वाचा >>> पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन महापार्टीची रिंगणात; परेश सुकूर घाटाळ यांना उमेदवारी जाहीर
उत्तनच्या जंजिरे धारावी किल्याला लागून चिमाजी अप्पा मैदान आहे.पालिकेच्या विकास आराखड्यात हे मैदान किल्ले विकासासाठी आरक्षित करण्यात आले आहे. सध्या या मैदानावर स्थानिक मच्छिमार मासळी सुखावण्याचे काम करत असून उर्वरित जागेत मुल क्रिकेट खेळत असतात..दरम्यान प्रत्येक जिल्हात सात ते आठ हॅलीपॅड’ची उभारणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यानुसार भाईंदर मध्ये हेलिपॅड उभारण्यासाठी पश्चिम येथील सुभाष चंद्र भोस मैदानाची निवड करण्यात आली होती.मात्र यास विरोध झाल्यानंतर हे हेलिपॅड उत्तनच्या चिमाजी अप्पा मैदानात उभारण्याचे ठरवण्यात आले.यासाठी स्थानिक तहसीलदारांमार्फत स्थळ पाहणी करून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.
हेही वाचा >>> वसई: महामार्गावर अंगाडियाची गाडी अडवून ५ कोटींची लूट; नकली पोलीस बनून रचली योजना
मात्र यामुळे मैदान नष्ट होणार असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी याविरोधात आंदोलन पुकारले आहे.यावरून गुरुवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मैदानाला भेट देऊन काम रद्द करण्याची मागणी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांस कडे केली आहे.तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना हॅलीपॅड स्थलांतरीत करण्याचे सांगितले असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.
“उत्तन येथील चिमाजी अप्पा मैदानाची जागा ही शासकीय आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हॅलीपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र आता स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे निर्णयाचा फेरविचार केला जाईल.” दिनेश गौंड – अप्पर तहसीलदार ( मिरा भाईंदर )