वसई: नववर्षाच्या पूर्व संध्येला विरार ते नालासोपारा या दरम्यान रेल्वे मार्गिकेत बिघाड झाल्याने मोटारमनने प्रसंगावधान राखत वातानुकूलित लोकल थांबविण्यात आली. मंगळवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे दीड ते दोन तास लोकल थांबून होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला तर काही प्रवाशांनी पायी प्रवास करीत स्थानक गाठले. विरार आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे मार्गिका वाकली होती. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परंतु, नागरिक आणि मोटारमन यांच्या लक्षात येताच तातडीने वातानुकूलित लोकल थांबविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पालघर जिल्ह्यात अवघ्या २८ जणांनी काढले मद्य परवाने; रिसॉर्ट मध्ये बेकायदेशीर मद्य विक्री

या प्रकारामुळे लोकल एक ते दीड तास उशिरा होत्या तसेच १२.४५ ची ए सी लोकल अनेक तास थांबून होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवाश्यांना कामावर जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांनी लोकल मधून उतरून रूळावरून चालत जाण्यास सुरुवात केली. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात वसई विरार मध्ये आले होते. तर प्रकारामुळे पर्यटकांना ही याचा फटका बसला.

हेही वाचा >>> वसईत व्याजाने कर्ज देणारी सावकारी टोळी सक्रीय, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेल्वे मार्गिका  दुरुस्तीचे काम सुरू केले होते. तीन ते चार तासांनी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत झाली. “रेल्वे मार्गिका एका ठिकाणी वाकली होती  काही प्रवाश्यांना ते दिसलं आणि वेळ असता मोटरमनच्या देखील ते लक्षात आल आणि लोकल थांबली. बराच वेळ लोकल थांबून असल्याने काही प्रवशी नालासोपाऱ्याच्या दिशेने तर काही विरराच्या दिशेने चालत सुटले- :- महेश भोईर, प्रवासी

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train services disrupted on virar nalasopara line after defect in railway track zws