वसई: विरार मध्ये मंगळवारी गाजलेल्या पैसे वाटप नाट्य प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात एकूण ४ गुन्हे दाखल झाले आहेत. विनोद तावडे यांच्यावर मतदारसंघात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर पैसे बाळगल्याप्रकरणी तर आमदार क्षितीज ठाकूर यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरारच्या विवांता हॉटेल मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीने केला आणि चार तास धुमाकूळ घातला. यावेळी भाजपच्या नेत्यांनाही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बविआच्या तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली असता  ९ लाख ९३ हजार रुपये रोख तसेच कागदपत्रे, डायरी आणि इतर प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकऱणी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> VIDEO : विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप, बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले, विरारमध्ये तणाव

भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारसंघात बेकायेदशीर प्रवेस करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रोख रक्कम हॉटेलच्या खोलीत आढळल्याने भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासाहीत अन्य भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. शिंदे गटाचे नेते सुदेश चौधरी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर आणि अन्य ५-६ जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 fir registered against bjp leaders vinod tawde rajan naik over money distribution in virar zws