वसई: नोटावाटप आरोप प्रकरण हा बहुजन विकास आघाडीचा स्टंट होता. यामुळे नालासोपारा मतदारसंघात आम्हाला पाच ते सात टक्क्यांची वाढ होईल तसेच वसई मतदारसंघातही लाभ होईल, असा दावा नालासोपारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उमेदवार राजन नाईक यांनी केला. नाईक यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची सभा घेत होते. या ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघडीचे कार्यकर्ते या हॉटेलमध्ये शिरले होते. बविआच्या कार्यकर्त्यांनी तब्बल साडेचार तास भाजपच्या नेत्यांची कोंडी केली होती. या ठिकाणी हॉटेलच्या खोलीत साडेनऊ लाख रुपयांची रोकड आढळली होती. या प्रकरणावर पहिल्यांदाच राजन नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – विरार मधील पैसे वाटप नाट्य प्रकरण: विनोद तावडे, राजन नाईक यांच्याविरोधात गुन्हे

हेही वाचा – VIDEO : विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप, बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले, विरारमध्ये तणाव

निवडणुकीच्या आदल्या दिवशी जाहीर सभा घेता येत नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेता येतात. त्याच बैठकीसाठी विनोद तावडे आले होते. परंतु बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येथे धुमाकूळ घातला. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. या प्रकरणामुळे नालासोपारा मतदारसंघांमध्ये आम्हाला पाच ते सात टक्के तसेच वसई मतदारसंघात तीन ते पाच टक्क्यांच्या मताधिक्यात वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉटेलमध्ये सापडलेल्या पैशांचा भाजपाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी सकाळी राजन नाईक यांनी नालासोपारा येथील नारायण शाळेत मतदान केले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 rajan naik nalasopara voting comment on bahujan vikas aghadi rajan naik talk on vinod tawde ssb