वसई- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईदंर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून बदली करण्यात आलेल्या ३ पोलीस अधिकार्‍यांची पुन्ह्या त्याच पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नवीन आलेल्या ६ पोलीस अधिकार्‍यांना त्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कायम करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने एकाच आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि त्यातील ज्या पोलीस अधिकार्‍यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या जागेवर मुंबईतून आलेल्या पोलीस निरीक्षकांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. या बदल्यांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. बदल्यांच्या विरोधात ३६ पोलिसांनी महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली होती. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी बदल्या होऊन गेलेल्या ३६ पैकी ७ पोलिसांना पुन्हा आयुक्तालयत बदली करण्यात आली होती. यापैकी संजय हजारे यांची मांडवी येथे, राजेंद्र कांबळे यांची काशिमिर्‍यात तर जितेंद्र वनकोटी यांची पेल्हार पोलीस ठाण्यात पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी हे आदेश काढले आहेत.

kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा – शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…

६ पोलीस निरीक्षक बनले वरिष्ठ पोलीस निरीक्षक

विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली होऊन पोलीस ठाण्यात आलेल्या ६ पोलीस निरीक्षकांना त्याच पोलीस ठाण्यात नियमित वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काशिमिर्‍यातील लालू तुरे यांची विरार येथे तर मांडवीतील प्रकाश कावळे यांची बोळींज पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार

असे आहेत पोलीस ठाण्यांचे अधिकारी

परिमंडळ २ आणि ३ (वसई विरार)
माणिकपूर- हरिलाल जाधव
नायगाव- विष्णू कदम
वालीव- दिलीप घुगे
नालासोपारा- विशाल वळवी
वसई- बाळकृष्ण घाडीगावकर
आचोळे- सुजिककुमार पवार
मांडवी- संजय हजारे
पेल्हार- जितेंद्र वनकोटी
बोळींज- प्रकाश कावळे
विरार- लालू तुरे
नालासोपारा- विजय जाधव

—————-

परिमंडळ(१) मिरा रोड, भाईंदर

नयानगर- अमर जगदाळे
मिरा रोड- मेघना बुरांडे
काशिगाव- महेश तोगरवाड
काशिमिरा- राजेंद्र कांबळे
शिवाजी नाईक- उत्तन

Story img Loader