वसई– नालासोपारा येथील एका मॉलच्या पर्यवेक्षकाने तरुणीची अश्लील छायाचित्रे काढून त्या आधारे तिचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तक्रार देऊनही कारवाई न केल्याने आगरी सेनेने मॉल मध्ये शिरून त्याला बेदम चोप दिला. पीडित तरुणी २२ वर्षांची असून ती नालासोपारा पूर्वेच्या कॅपिटॉल मॉल मधील लाईफ स्टाईल या दुकानात काम करते. या दुकानाती पर्यवेक्षक विश्वनाथ भोवड (२८) याने मे महिन्यात तिची चेंजिग रुम मध्ये तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे सर्वत्र वायरल करण्याची धमकी देत तिच्याशी विविध ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याच्या या त्रासामुळे पीडित तरुणीने काम सोडून दिले होते. त्यामुळे भोवड याने तिची अश्लील छायात्रिते पीडित मुलीच्या प्रियकरला पाठवून तिची बदनामी केली. शेवटी हा प्रकार तिने घरी सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्पा पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि आरोपीवर कारवाई केली नाही.त्यामुळे पीडीत मुलीचे कुटुंबियांनी आगरी सेनेची मदत घेतली.आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसून आरोपी विश्वनाथ भोवड याला चोप दिला आणि नंतर आचोळे पोलिसांच्या ताब्यात दिले. आचोळे पोलिसांनी आरोपी भोवड याच्याविरोधात बलात्कारचा ३७६ तसचे माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.